Sun, Feb 24, 2019 03:06होमपेज › Aarogya › बटाटे नसतात आरोग्यासाठी हानिकारक

बटाटे नसतात आरोग्यासाठी हानिकारक

Published On: Feb 13 2018 2:09AM | Last Updated: Feb 13 2018 2:09AMलंडन :

बटाटा जगभरात सहज उपलब्ध होतो आणि स्वतंत्रपणे किंवा कुठल्याही भाजीशी गुण्यागोविंदाने शिजून पदार्थाची चव वाढवतो. बटाट्याचा उपयोग अनेक प्रकारचे पदार्थ तयार करण्यासाठी केला जातो. मात्र, असे मानले जाते की, बटाटे आरोग्यासाठी फारसे चांगले नसतात. बटाट्यामुळे फॅट आणि शर्करेचा स्तर वाढतो. मात्र, स्कॉटलंडच्या जेम्स हट्टन इन्स्टिट्यूटच्या संशोधकांनी म्हटले आहे की, एखादा माणूस आयुष्यभर बटाटे खात राहिला तरी काही विपरीत परिणाम होत नाहीत! याउलट बटाट्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो आणि डिमेन्शियालाही तो दूर ठेवतो. बटाट्यात वेगवेगळी जीवनसत्त्वे आणि खनिजे अधिक प्रमाणात असतात.