Sun, Oct 20, 2019 06:55होमपेज › Aarogya › ICSI केली... पुढे काय?

ICSI केली... पुढे काय?

Published On: Nov 08 2018 1:29AM | Last Updated: Nov 07 2018 8:44PMडॉ. प्रवीण हेन्द्रे

‘डर के आगे जीत है’ ही जाहिरात आपण खूप वेळा पाहिली आहे. ICSI केले, पण पुढे काय? ICSI (Intra Cytoplasmic Sperm Injection) नंतर गर्भाचे गर्भाशयात प्रत्यारोपण केले जाते व नंतर जवळ जवळ 15 दिवसांचा कालावधी हा अगदी जीवघेणा असतो. हा तयार झालेला गर्भ गर्भाशयाला चिकटेल किंवा नाही याचा निर्णय गर्भाचे रोपण (Embryo transfer) केल्यानंतर बरोबर 15 दिवसांनी BetaHCG ची रक्‍ताची तपासणीअंती समजते. त्याचे रक्‍तातील प्रमाण 50 IU, 100 IU किंवा 500 IU अशा पद्धतीने येते. 15 व्या दिवशी BetaHCG चे रक्‍तातील प्रमाण 100 IU पेक्षा जास्त असल्यास त्यास गर्भधारणेची शक्यता जास्त असते. 10 IU ते 100 IU ला केमिकल गर्भधारणा झाली असे म्हणता येईल. केमिकल गर्भधारणा म्हणजे गर्भाशयात गर्भ रूजतो; परंतु त्याची वाढ होत नाही. 100 IU पेक्षा जास्ती Beta HCG चे प्रमाण असल्यास 10 दिवसानंतर  सोनोग्राफीमध्ये गर्भधारणा झालेला पुरावा दिसतो.

एकदा ही गर्भधारणा दिसली की हायसे होते. त्यानंतर 8 ते 10 दिवसांनी त्या गर्भात हृदयाची स्पंदने दिसून येतात व त्यानंतर साधारण 9 ते 11 आठवड्यांचा गर्भ झाल्यानंतर साधारण 90% गर्भाची शेवटपर्यंत वाढ होते व स्त्रीस इतर कोणतेही आजार नसतील तर बाळ आपल्या हातात मिळते. ICSI नंतर गर्भपाताचे प्रमाण इतर नैसर्गिक गर्भधारणेपेक्षा जास्त असते. आता काही सेंटर्समध्ये एका पाळीमध्ये ICSI केली जाते व तयार केलेल्या गर्भावरती प्रक्रिया करून ते गोठवले जातात. Liquied Nitrogen मध्ये संग्रहित केले जातात. ICSI करण्यापूर्वी स्त्रीबीजांचे संकलन केले जाते. त्यावेळी भूल देऊन जनन मार्गावाटे एका सुक्ष्म सुईच्या द्वारे Ovum pickup केले जाते. त्यावेळी स्त्रीबीजांड कोषास थोडी इजा होते व काही स्त्रियांमध्ये त्यातून  होणार्‍या अनुचित परिणामामुळे गर्भधारणा होण्यास अनुकुलता कमी होते. त्यामुळे असे तयार केलेले गर्भ गोठवून ठेवून पुढच्या महिन्याच्या पाळीदरम्यान Embryo transfer गर्भप्रत्यारोपण केले जातात.

या प्रक्रियेस cryopreservation असे संबोधले जाते. काही वेळा जास्तीची स्त्रीबीजे निर्माण होतात. अशावेळीसुद्धा 2 ते 3 गर्भ गर्भाशयात सोडले जातात व उर्वरित गर्भ गोठवून त्यांची साठवणूक केली जाते. हे साठवलेले गर्भ कालांतराने गर्भाशयात सोडून गर्भ तयार करता येतो. Liquied Nitrogen च्या अतिथंड उणे 196oc तापमान असते. अशा अतिथंड तापमानामध्ये गोठवलेल्या उतीची चयापचय क्रिया (Metabolism) अगदी नगण्य असल्यामुळे जोपर्यंत या Cells अतिथंड वातावरणामध्ये ठेवल्या जातात. तोपर्यंत त्या जिवंत राहतात व गरजेप्रमाणे त्या Thaw वितळवून पुन्हा कार्यरत करणे शक्य असते. आता स्त्रीबीजे, शुक्राणू तसेच स्त्रीबीजांडे, वृषण व गर्भ सर्रास गोठविले जातात. शुक्राणूची पहिली यशस्वीरीत्या गोठवण्याची प्रक्रिया 1949 साली झाली. जवळजवळ 70 वर्षे ही प्रक्रिया प्रचलित आहे. माणसापेक्षा पशुपक्ष्यांमध्ये Sperm  शुक्राणू गोठवून वापरण्याची पद्धती जास्त प्रमाणात वापरली जाते.

थोडेसे Assisted Hatching बाबत सर्वसामान्यपणे आपण कोंबडीचे अंडे पाहतो. कोंबडीच्या अंड्याची उबवणूक 21 दिवस केली जाते. हे उबवणीक्षम (Ferfilized)  अंडे कोंबडी 21 दिवस आपल्या शरीराच्या उबेने उबवून 21 व्या दिवशी पिल्‍लू अंड्याचे कवच फोडून बाहेर येते. जसे मानवी गर्भाला प्राणवायू O2 चा पुरवठा गर्भाशयास चिकटलेल्या वारेद्वारे होतो. 

तसेच काहीसे कोंबडीच्या अंड्याच्या आत रक्‍तवाहिन्याचे जाळे तयार होऊन सुक्ष्म छिद्रे असलेल्या अंड्याच्या कवचाच्या आरपार जाणार्‍या O2 प्राणवायू व कार्बनडाय Co2 ऑक्साईडचे उत्सर्जन होत असते. 21 दिवसांमध्ये जगण्यासाठी व संपूर्ण वाढ होण्यासाठी अन्‍नपुरवठा कोंबडीच्या अंड्यामध्ये त्याच्या बलकामध्ये असतो; पण मानवी अंड्याला एक Zona Pellucida नावाचे कठीण कवच असते. त्याचे कार्य गर्भनलिकेमध्ये स्त्रीबीज व शुक्राणूचे फलन झाल्यापासून ते गर्भ गर्भाशयात येऊन रूजेपर्यंत आतील Cells  चे संरक्षण करणे असते.

हे कवच Zona Pellucida  फलन क्रियेनंतर 4 ते 5 दिवसानंतर विघटन होऊन गर्भाशयाच्या Endometrium मध्ये जशी झाडाची मुळे खोलवर जमीन पोखरून रूजतात तशी Endometrium ला पोखरून गर्भ गर्भाशयात रूजतो. Zona Pellucidia कवचाचे विघटन कृत्रिमरीत्या करणे म्हणजेच कृत्रिमपणे कवच विघटन अथवा Assisted Hatching म्हणतात. ते "Mechanical Disection"  म्हणजेच सुक्ष्म विच्छेदन व Chemical Zona drilling  म्हणजेच Tyrode Acid रसायन वापरून केले जाणारे विच्छेदन. तसेच Enzyme Pronase च्या सहाय्यानेसुद्धा गर्भाच्या कवचाचे विच्छेदन करता येते व लेझरच्या किरणाद्वारे करता येते. साधारणपणे ज्या स्त्रीयामध्ये पूर्वी IVF Fail झालेले असते. अशा दाम्पत्यामध्ये त्याचा वापर केलेला आढळतो. अशाप्रकारे विविध प्रकारच्या क्रिया प्रक्रिया करून स्त्रीला गर्भधारणा होण्यास मदत केली जाते. गर्भधारणा झाली की सगळे काही All is well ठीक झाले असे होत नाही. जसे “प्यार करना आसान लेकीन निभाना मुश्कील” तसेच जरी गर्भधारणा झाली तरीसुद्धा गर्भाचे गर्भाशयात संगोपण व्यवस्थित होऊन शेवटी बाळ व बाळंतीण सुखरूप होण्यासाठी कोणती उपाययोजना करावी लागते, याचा आढावा घेऊया. कारण मला दिवस गेले होेते. हे सांगण्यास त्या स्त्रीला तिच्या जीवनात जरी थोडे समाधान व महत्त्वाचे असले तरी अंतिम लढाई ही जिंकण्यासाठी Take Home Baby म्हणजेच बाळ सुखरूप घरी आणणे असणे साहजिक आहे.

A) Chemical Pregnancy म्हणजे Beta HCG मध्ये गर्भधारणा दिसते.

B) Documated Pregnancy म्हणजेच सोनोग्राफीवरती गर्भ असल्याचा पुरावा मिळणे. पेक्षा बाळ आपल्या Take Home Baby कुशीत व खांद्यावर खेळविणे हेच गर्भधारणेसाठी उत्सुक असलेल्या दाम्पत्याचे ध्येय असते, ते पूर्ण करण्यास कशी मदत लागते ते पुढील लेखात पाहू.