Sun, Feb 24, 2019 02:36होमपेज › Aarogya › थकवा दूर करणाऱ्या टिप्स

थकवा दूर करणाऱ्या टिप्स

Published On: Feb 11 2018 7:05PM | Last Updated: Feb 11 2018 7:05PMपुढारी ऑनलाईन टीम

सततचे काम, शरीराला विश्रांती न दिल्याने खूप थकवा आणि अशक्तपणा येतो. अशावेळी काम करायचे ठरवले तरी शरीर मात्र साथ देत नाही. या थकव्याला दूर करण्याचे सोल्युशन आपल्याच हातात आहे. पाहूयात कोणत्या गोष्टी तुम्हाला थकव्यापासून दूर करतील...

आहार

जेवण वेळेवर न घेणे, जंक फूड खाणे, स्टार्च आणि गोड पदार्थ खूप खाणे यामुळे अशक्तपणा येतो. यासारख्या सवयींमुळे रक्तातील साखरेची पातळी कमी-जास्त होते आणि आरोग्याच्या तक्रारी निर्माण होतात. शरीराला पुरेशी एनर्जी मिळत नाहीत. तेव्हा प्रॉपर डाएट घेतला जाईल, याची काळजी घ्यावी. रोजचा आहार शक्यतो ठरलेल्या वेळेतच घ्यावा. पोषणतत्वांचा समावेश असलेला संतुलित आहार घ्यावा. दर दोन ते तीन तासांनी थोडे थोडे खावे.

मानसिक ताण

एखाद्या गोष्टीचा अतिविचार, सतत निगेटीव्ह विचार करणे किंवा मला सगळं येतं अशा अविर्भावात राहणे, यासारख्या गोष्टी आपल्याला पॉझिटीव्हनेसपासून दूर नेतात. यामुळे मानसिक थकवा येतो. तेव्हा तुम्ही तुमच्या विचाराची दिशा सुरूवातीला बदलली पाहीजे. 

विनाकारण भिती

एखाद्या गोष्टीची विनाकारण भिती बाळगल्यामुळे आलेल्या समस्या, तसेच नकारात्मक विचारांमुळे फेस करावे लागलेले प्रॉब्लेम्स, याबद्दल एका ठिकाणी लिहून ठेवा आणि समस्येवर कशी मात करता येईल, याचा विचार करा.

रिकाम्या वेळेचे नियोजन

थोडा जरी मोकळा वेळ मिळाला तरी टिव्ही बघत बसावे किंवा पुस्तक वाचण्याची सवय लावून घ्यावी. कारण त्यामुळे माइंड रिलॅक्स होते. दिवसभर आपण ऑफिसच्या कामात व्यस्त असतो किंवा घरातही सातत्याने काही ना काही काम असतेच. परिणामी धावपळीमुळे श्वासोच्छवास आणि हार्ट बीट्सचा रेट कमी होतो. तसेच ब्लड सर्क्युलेशन मंदावते. त्यामुळे आपल्याला थकवा जाणवतो. 

व्यायाम/ योगा

शरीरास मुबलक ऑक्सिजन न मिळाल्यास आपल्याला थकवा जाणवतो. त्यामुळे इतर समस्यांना तोंड द्यावे लागते. तेव्हा शक्य तितक्या वेळेस दिर्घ श्वास घेऊन सोडण्याची सवय लावून घ्या. त्यामुळे प्रेशर कमी होते. त्यामुळे रोज किमान अर्धा तास तरी व्यायाम, योगा करावा.